Posts

Showing posts from April, 2024

इतिहासातिल किल्ले व त्यांची महिती-काळदुर्ग

Image
  महाराष्ट्रातील  जवळपास ४०० हून अधिक  किल्ल्यांची  यादी खाली दिली आहे. बऱ्याच किल्ल्यांना एकापेक्षा अधिक नावाने ओळखले जाते. काही किल्ल्यांचे इतिहासात वेगळ्या नावाने संदर्भ आहेत, पण आता त्यांना त्या नावाने ओळखले जात नाही. बऱ्याच किल्ल्यांचे ऐतिहासिक संदर्भ तर आढळतात पण त्यांच्या खुणा ह्या पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत, तर बरेच किल्ले हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रात वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट व गिरिदुर्ग या प्रकारचे किल्ले आहेत. काळदुर्ग महाराष्ट्र  राज्यातील  पालघर  जिल्ह्यात अनेक डोंगरी किल्ले आहेत. ठाणे व जव्हारच्या सीमेवर असणारे हे डोंगरी किल्ले शहरी भागापासून फारसे लांब नसल्यामुळे मुंबईकरांना हे किल्ले एका दिवसात आरामात पाहता येतात. येथे जंगल खूप असल्याने य़ेथे आदिवासी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आजही (२० २०साली) हा सारा परिसर मागासलेल्या अवस्थेत आहे. नाव काळदुर्ग उंची समुद्रसपाटीपासून १५०० फूट प्रकार गिरिदुर्ग चढाईची श्रेणी मध्यम ठिकाण ठाणे जिल्हा ,  महाराष्ट्र ,  भारत जवळचे गाव पालघर डोंगररांग पालघर खरे पहिले तर काळदुर...

इतिहासातिल किल्ले वि त्यांची महिती

Image
  मुरुड जंजिरा मुरुड जंजिरा रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनार्‍यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड-जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजीच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला. इतिहास जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी...

इतिहासातिल किल्ले व त्यांची महिती

Image
  राजगड किल्ला इतिहास  राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. डोंगराला किल्ल्याचे स्वरुप गौतमीपुत्र सातकर्णी याने दिले. बहुधा सन १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. मराठेशाहीची २६ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून, हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदावी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली. १)'राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले उभ्या स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळयांचे नेते शिवाजी भेासले यांना राज्यविस्तारासाठी या किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला.' -जेम्स डग्लस(बुक ऑफ बॉम्बे) २) साकी मुस्तैदखान त्याच्या मासिरे आलिमगिरे नावाच्या ग्रंथात म्हणतो- 'राजगड हा अतिशय उंच. त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल....