इतिहासातिल किल्ले व त्यांची महिती-काळदुर्ग

 महाराष्ट्रातील जवळपास ४०० हून अधिक किल्ल्यांची यादी खाली दिली आहे. बऱ्याच किल्ल्यांना एकापेक्षा अधिक नावाने ओळखले जाते. काही किल्ल्यांचे इतिहासात वेगळ्या नावाने संदर्भ आहेत, पण आता त्यांना त्या नावाने ओळखले जात नाही. बऱ्याच किल्ल्यांचे ऐतिहासिक संदर्भ तर आढळतात पण त्यांच्या खुणा ह्या पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत, तर बरेच किल्ले हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रात वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट व गिरिदुर्ग या प्रकारचे किल्ले आहेत.


काळदुर्ग

महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात अनेक डोंगरी किल्ले आहेत. ठाणे व जव्हारच्या सीमेवर असणारे हे डोंगरी किल्ले शहरी भागापासून फारसे लांब नसल्यामुळे मुंबईकरांना हे किल्ले एका दिवसात आरामात पाहता येतात. येथे जंगल खूप असल्याने य़ेथे आदिवासी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आजही (२० २०साली) हा सारा परिसर मागासलेल्या अवस्थेत आहे.
नावकाळदुर्ग
उंचीसमुद्रसपाटीपासून १५०० फूट
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणठाणे जिल्हामहाराष्ट्रभारत
जवळचे गावपालघर
डोंगररांगपालघर

खरे पहिले तर काळदुर्गला गड म्हणणे योग्य नाही, कारण गड असल्याची कोणतीही खूण या गडावर नाही. हे एक टेहळणीचे ठिकाण असावे असे वाटते.

इथे गडाच्या खाली तुम्हांला खूप माकडे दिसतील, सर्व माकडे माणसाळलेली असल्याने त्यांना खाण्यासाठी काहीतरी घेऊन जावे. गडाच्याया खाली मन प्रसन्न करणारा एक छोटा धबधबा आहे. पावसाळ्यात तर इथले वातावरण खूपच सुंदर असते

गडावरील ठिकाणे

हा किल्ला दोन थरांत विभागला आहे. एक, गडमाथा म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडाच होय. या कातळामुळे हा गड लांबूनही नजरेत येतो. गडाचे क्षेत्रफळ अर्धा एकर असावे. दुसरा विभाग म्हणजे, गडमाथ्याच्या खालच्या पठारावर पाण्याचे मोठे टाके आहे. एक कुंडदेखील आढळते. पठारावरून गडमाथ्यावर जाण्यास पायऱ्या आहेत. किल्ल्यावरून सर्व घाटमाथ्यावर नजर ठेवता येते.

गडावर जाण्याच्या वाटा

काळदुर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काळदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

काळदुर्ग
नावकाळदुर्ग
उंचीसमुद्रसपाटीपासून १५०० फूट
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणठाणे जिल्हामहाराष्ट्रभारत
जवळचे गावपालघर
डोंगररांगपालघर




महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात अनेक डोंगरी किल्ले आहेत. ठाणे व जव्हारच्या सीमेवर असणारे हे डोंगरी किल्ले शहरी भागापासून फारसे लांब नसल्यामुळे मुंबईकरांना हे किल्ले एका दिवसात आरामात पाहता येतात. येथे जंगल खूप असल्याने य़ेथे आदिवासी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आजही (२० २०साली) हा सारा परिसर मागासलेल्या अवस्थेत आहे.

इतिहास




खरे पहिले तर काळदुर्गला गड म्हणणे योग्य नाही, कारण गड असल्याची कोणतीही खूण या गडावर नाही. हे एक टेहळणीचे ठिकाण असावे असे वाटते.

इथे गडाच्या खाली तुम्हांला खूप माकडे दिसतील, सर्व माकडे माणसाळलेली असल्याने त्यांना खाण्यासाठी काहीतरी घेऊन जावे. गडाच्याया खाली मन प्रसन्न करणारा एक छोटा धबधबा आहे. पावसाळ्यात तर इथले वातावरण खूपच सुंदर असते


गडावरील ठिकाणे

हा किल्ला दोन थरांत विभागला आहे. एक, गडमाथा म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडाच होय. या कातळामुळे हा गड लांबूनही नजरेत येतो. गडाचे क्षेत्रफळ अर्धा एकर असावे. दुसरा विभाग म्हणजे, गडमाथ्याच्या खालच्या पठारावर पाण्याचे मोठे टाके आहे. एक कुंडदेखील आढळते. पठारावरून गडमाथ्यावर जाण्यास पायऱ्या आहेत. किल्ल्यावरून सर्व घाटमाथ्यावर नजर ठेवता येते.

गडावर जाण्याच्या वाटा

वाघोबा खिंड मार्गे : वाघोबा खिंडीला जाण्यासाठी लोक मुंबईहुन विरारमार्गे पालघरला किंवा कल्याणहून एस. टी. ने पालघरला येतात व मनोरेला जाणाऱ्या बसने 'वाघोबा' नावाच्या देवळाच्या थांब्यावर उतरतात. येथूनच, देवळाच्या उजवीकडे जाणाऱ्या वाटेने गेल्यास माणूस गडावर पोहचू शकतो.

पुरंदर किल्ला

पुरंदर किल्ला

Purandar Fort entrance 2.jpg


सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैर्‌ऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे.

पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते

इतिहास

पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे 'इंद्रनील पर्वत'. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदर्‍या बुरूज बंधाताना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बाहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनीअनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १२ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला.

पुरंदरचा तह

शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदराला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरीमध्ये असे आढळते.

'तेव्हा पूरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता. त्याजबरोबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठान पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धूरंधर युद्ध जहले. मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.'


खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहासप्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. 

Comments

  1. माहितीचे सादरीकरण उत्तम...👍

    ReplyDelete
  2. खूप सुंदर माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

इतिहासातिल किल्ले व त्यांची महिती

इतिहासातिल किल्ले वि त्यांची महिती