इतिहासातिल किल्ले व त्यांची महिती-काळदुर्ग
महाराष्ट्रातील जवळपास ४०० हून अधिक किल्ल्यांची यादी खाली दिली आहे. बऱ्याच किल्ल्यांना एकापेक्षा अधिक नावाने ओळखले जाते. काही किल्ल्यांचे इतिहासात वेगळ्या नावाने संदर्भ आहेत, पण आता त्यांना त्या नावाने ओळखले जात नाही. बऱ्याच किल्ल्यांचे ऐतिहासिक संदर्भ तर आढळतात पण त्यांच्या खुणा ह्या पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत, तर बरेच किल्ले हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रात वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट व गिरिदुर्ग या प्रकारचे किल्ले आहेत.
काळदुर्ग
| नाव | काळदुर्ग |
| उंची | समुद्रसपाटीपासून १५०० फूट |
| प्रकार | गिरिदुर्ग |
| चढाईची श्रेणी | मध्यम |
| ठिकाण | ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
| जवळचे गाव | पालघर |
| डोंगररांग | पालघर |
खरे पहिले तर काळदुर्गला गड म्हणणे योग्य नाही, कारण गड असल्याची कोणतीही खूण या गडावर नाही. हे एक टेहळणीचे ठिकाण असावे असे वाटते.
इथे गडाच्या खाली तुम्हांला खूप माकडे दिसतील, सर्व माकडे माणसाळलेली असल्याने त्यांना खाण्यासाठी काहीतरी घेऊन जावे. गडाच्याया खाली मन प्रसन्न करणारा एक छोटा धबधबा आहे. पावसाळ्यात तर इथले वातावरण खूपच सुंदर असते
गडावरील ठिकाणे
गडावर जाण्याच्या वाटा
काळदुर्ग
काळदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
| काळदुर्ग | |
| नाव | काळदुर्ग |
| उंची | समुद्रसपाटीपासून १५०० फूट |
| प्रकार | गिरिदुर्ग |
| चढाईची श्रेणी | मध्यम |
| ठिकाण | ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
| जवळचे गाव | पालघर |
| डोंगररांग | पालघर |
महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात अनेक डोंगरी किल्ले आहेत. ठाणे व जव्हारच्या सीमेवर असणारे हे डोंगरी किल्ले शहरी भागापासून फारसे लांब नसल्यामुळे मुंबईकरांना हे किल्ले एका दिवसात आरामात पाहता येतात. येथे जंगल खूप असल्याने य़ेथे आदिवासी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आजही (२० २०साली) हा सारा परिसर मागासलेल्या अवस्थेत आहे.
इतिहास
खरे पहिले तर काळदुर्गला गड म्हणणे योग्य नाही, कारण गड असल्याची कोणतीही खूण या गडावर नाही. हे एक टेहळणीचे ठिकाण असावे असे वाटते.
इथे गडाच्या खाली तुम्हांला खूप माकडे दिसतील, सर्व माकडे माणसाळलेली असल्याने त्यांना खाण्यासाठी काहीतरी घेऊन जावे. गडाच्याया खाली मन प्रसन्न करणारा एक छोटा धबधबा आहे. पावसाळ्यात तर इथले वातावरण खूपच सुंदर असते
गडावरील ठिकाणे
हा किल्ला दोन थरांत विभागला आहे. एक, गडमाथा म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडाच होय. या कातळामुळे हा गड लांबूनही नजरेत येतो. गडाचे क्षेत्रफळ अर्धा एकर असावे. दुसरा विभाग म्हणजे, गडमाथ्याच्या खालच्या पठारावर पाण्याचे मोठे टाके आहे. एक कुंडदेखील आढळते. पठारावरून गडमाथ्यावर जाण्यास पायऱ्या आहेत. किल्ल्यावरून सर्व घाटमाथ्यावर नजर ठेवता येते.
गडावर जाण्याच्या वाटा
वाघोबा खिंड मार्गे : वाघोबा खिंडीला जाण्यासाठी लोक मुंबईहुन विरारमार्गे पालघरला किंवा कल्याणहून एस. टी. ने पालघरला येतात व मनोरेला जाणाऱ्या बसने 'वाघोबा' नावाच्या देवळाच्या थांब्यावर उतरतात. येथूनच, देवळाच्या उजवीकडे जाणाऱ्या वाटेने गेल्यास माणूस गडावर पोहचू शकतो.
पुरंदर किल्ला
पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते
इतिहास
पुरंदरचा तह
'तेव्हा पूरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता. त्याजबरोबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठान पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धूरंधर युद्ध जहले. मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.'
खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहासप्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले.

माहितीचे सादरीकरण उत्तम...👍
ReplyDeleteखूप सुंदर माहिती
ReplyDelete